नागपूरच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये सिझलर खाताना धक्का! लाकडी बेसमधून निघाली वाळवी; VIDEO व्हायरल, FDA कारवाई करणार?

नागपूरमधील प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. मेडिकल चौकातील हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये सिझलर सर्व्ह करण्यासाठी वापरण्यात आलेल्या लाकडी बेसमधून वाळवीसदृश कीटक बाहेर आल्याचा दावा ग्राहकाकडून करण्यात आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्राहकाने रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी उर्वरित खाद्यपदार्थ परत नेल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *