कोस्टल रोडवरुन BMW उडून पडली, प्राण सोडले तरी शनयचा पाय ॲक्सिलरेटरवरच, एक मित्र 20 फूट दूर फेकला गेला, अपघाताचा थरार समोर

सागरी किनारा मार्गावरून जाणारी भरधाव बीएमडब्ल्यू कार खाली कोसळून रविवारी पहाटे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला. लोटस जेट्टीजवळ हा अपघात झाला. एका कार चालकाने पोलिसांना सूचना दिल्याने अपघाताच्या घटना उघडकीस आली.

काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू (डीडी-०१-सी-६३०२) मरिन ड्राइव्हच्या दिशेने हाजी अलीकडे जात होती. लोटस जेट्टीजवळ आल्यानंतर कार कोस्टल रोडच्या नॉर्थबाउंड मार्गावरील पुलाच्या कट्ट्यावरून खाली कोसळून कार पार्किंगचे काम सुरू असलेल्या परिसरात आदळली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *