डीजे कमी तरी नागरिकांना त्रास? विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्री आवाजाने गाठला उच्चांक

ठाण्यातील विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर कमी असला, तरी त्याची जागा आता मोठ्या ढोल-ताशांसह ध्वनिवर्धक आणि मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या धातूच्या टोल वाद्यांनी घेतल्याचे चित्र शनिवारी गौरी-गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये दिसून आले.

गौरी-गणपती विसर्जन

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते व जनहित याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केलेल्या ध्वनिपातळीच्या निरीक्षणात ध्वनिपातळी १०५ डेसिबलपर्यंत पोहोचली होती. विशेष म्हणजे, दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी नोंदवलेल्या १०० डेसिबलच्या कमाल पातळीच्या तुलनेत यावेळी ध्वनिपातळी १०५ डेसिबलपर्यंत वाढल्याचे दिसून आले.

निपातळी

ठाण्यातील राम मारुती रोडवर रात्री ९.३० वाजता ८५ ते ९० डेसिबल ध्वनिपातळी नोंदविण्यात आली. या मार्गावर अनेक मिरवणुका एकाच वेळी सुरू होत्या. बहुतांश मिरवणुकांमध्ये ढोल-ताशे आणि बॅन्जो होते, तर सुमारे निम्म्या मिरवणुकांमध्ये स्पीकर्स, साउंड सिस्टीम वापरल्या जात होत्या.

आवाजाची सरासरी पातळी

या परिसरातील आवाजाची सरासरी पातळी ८५ ते ९५ डेसिबल असल्याचे निरीक्षणात नमूद करण्यात आले. पाचपाखाडी रोडवर रात्री १० वाजता ९० ते ९५ डेसिबल, तर टीएमसी सर्कल येथे रात्री १०.३० वाजता ९० ते ९५ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली.

फटाक्यांचाही वापर केल्याचे नमूद

गौरी-गणपती विसर्जनाच्या निरीक्षणात बॉलिवूड गाण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, डीजेची जागा मोठ्या संख्येने ढोल, साउंड सिस्टीमआणि टोल वाद्यांनी घेतल्याने एकत्रित आवाजाची तीव्रता कमी झालेली नसल्याचे निरीक्षणातून दिसते. काही मिरवणुकांमध्ये फटाक्यांचाही वापर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *