डॉक्टर पत्नीचा गूढ मृत्यू, डॉ नीलेश जेजूरकरला अटक, मैत्रिणीच्या सल्ल्याने बायकोकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचा प्रमुख डॉ. नीलेश दत्तात्रय जेजूरकर याला पत्नी डॉ. मनीषा हिला जीव देण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली असून, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत डॉ. नीलेशने जामिनासाठी केलेली धावपळ निष्फळ ठरली आहे.

बहिणीची तक्रार, पतीवर गुन्हा

६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरातील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये डॉ. मनीषा नीलेश जेजूरकर (वय ४०) यांनी गळफास घेत आयुष्याची अखेर केली होती. त्यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी पोलिसांत फिर्याद दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. नीलेशविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा गंगापूर पोलिसांत नोंद आहे. १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेदेखील नीलेशला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्यानुसार शुक्रवारी (दि. १८) दुपारी गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत कसून चौकशीला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *