सराफा बाजारातील सोने आणि चांदीचे गेल्या काही दिवसांपासून सतत गगनाला भिडले आहेत. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले तरीही या हालचालींचा सोन्या-चांदीच्या दरांवर फारसा परिणाम झाला नाही. उलट घसरत्या किमतींनी युटर्न घेतला आणि टॉप-गियरसह तेजीच्या लाटेवर स्वार झाले असून या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी तेजीची वाट धरली.
सोन्या-चांदीच्या दरांत तेजीची नवलाई
आदल्या दिवशी, शुक्रवारी, सोन्याच्या किमती एक आठवड्याच्या शिखरावर पोहोचल्या. कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींमुळे सराफा बाजारातील तेजीला चालना मिळाली आणि महागाईची चिंता कमी झाली. मात्र, त्यासोबतच अमेरिकी डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या दरवाढ काहीशी मंदावली. सोन्याबरोबर चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियमच्या वाढीसह, फेड रिझर्व्हच्या व्याजदर वाढीमुळे बाजारातील भावना कायम राहिली.
