अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने स्वत:च्याच मुलासोबत लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली दिली आहे. माझा मुलगा किशोरवयीन असल्यापासून त्याच्यासोबत ‘केवळ 100 वेळा’ मी लैंगिक संबंध ठेवलेत अशी कबुली या महिलेने दिली आहे. ही गोष्ट तिने तिच्या पतीपासून लपवून ठेवली होती. 46 वर्षीय क्रिस्टिना क्लेमेन्स आणि 22 वर्षीय शेन क्लेमेन्स यांच्यातील हे अनैतिक संबंध तेव्हा उघडकीस आल्यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी या महिलेने अजून एक कट रचला. आपण केलेलं कृत्य समोर आल्यानंतर आरोपी क्रिस्टिनाने गेल्या महिन्यात अचानक पोलिसांना फोन करुन तातडीची मादत मागितली. पोलिसांना घरी बोलावून घेतल्यानंतर तिने मुलावरच आरोप करताना, शेनने माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला.
पोल्क काउंटीचे शेरीफ ग्रॅडी ज्यूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीही कारण नसताना आईने स्वत:ला वाचवण्यासाठी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केल्याने शेनला राग आला आणि त्याने पोलिसांसमोर दोघांमधील लैंगिक संबंधांचं हे गुपित उघड केले. त्याने सांगितले की, तो 18 वर्षांचा असल्यापासून त्याच्या आईसोबत लैंगिक संबंध ठेवत होता.
आरोपी महिलेला जाब विचारला असता म्हणाली…
“तिने फोन केल्यावर आणि आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो आणि त्याला आईला मारल्याबद्दल अटक केली. त्यावरुन तो प्रचंड संतापला. मग आम्हाला तो म्हणाला, ‘मी तुम्हाला खरं सांगतो, मी 18 वर्षांचा असल्यापासून माझ्या आईसोबत लैंगिक संबंध ठेवत आहे,'” अशी माहिती ज्यूड यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिली आहे. ज्यूड यांनी क्रिस्टिनाकडे वळून तिला शेन जे बोललाय ते खरं आहे का याबद्दल विचारले. मुलगा किशोरवयीन असल्यापासून ती त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवत होती का? असं ज्यूड यांनी विचारलं तेव्हाच क्रिस्टिनाने कथितपणे, “फक्त सुमारे 100 वेळाच”, असं उत्तर दिलं.
या संबंधांबद्दल पती काय म्हणाला?
त्यानंतर, तपास अधिकाऱ्यांनी क्रिस्टिनाच्या पतीला याबद्दल विचारले. आई आणि मुलामधील अनैतिक संबंधांबद्दल पतीला कल्पना होती का याबद्दल पोलिसांनी चौकशी केली. या संदर्भात कोणतीही माहिती नसलेल्या पतीने पोलिसांना, ‘आमचं वैवाहिक जीवन आनंदात सुरु होते. मला या गुपिताबद्दल पूर्णपणे माहिती नसली तरी, त्यांच्या वागणुकीबद्दल मला थोडा संशय होता,” असं सांगितलं.
“‘तुमची पत्नी तिच्या मुलासोबत लैंगिक संबंध ठेवत होती याची तुम्हाला जाणीव होती का?’” क्रिस्टिनाच्या पतीला विचारल्याचे ज्यूड यांनी सांगितले. “तो म्हणाला, ‘नाही, मला अजिबात माहिती नव्हती. पण मला थोडा संशय होता. कारण ते दोघे बेडरूममध्ये जाऊन दरवाजा आतून बंद करायचे,” असं उत्तर पतीने दिलं. हा सारा एक घृणास्पद प्रकार असल्याचं नमूद करत शेरीफने, “तुम्ही या असल्या प्रकाराला आणखी काय म्हणू शकता?” असा सवाल उपस्थित केला.
