दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वाहतूक मार्गात मोठे बदल ; उत्सवानिमित्त ठाणेकरांवर असणार ड्रोनच्या नजरा

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने शनिवार, ५ सप्टेंबर रोजी शहरात वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत विविध रस्त्यांवर वाहतुकीसाठी निर्बंध असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित

टेंभी नाका, टॉवर नाका, ब्राह्मण सभा हॉल परिसर तसेच स्टेशन रोड येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार या मार्गांवर प्रवेश बंद करून वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *