कोट्यवधींचा खर्च वाया, माता- बाल रुग्णालयांच्या इमारती वापराविना; बांधकाम पुन्हा करण्याची वेळ

महापालिकेच्या प्रशासकीय काळात कोपरखैरणे आणि दिघा परिसरातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या स्वतंत्र माता-बाल रुग्णालयांच्या इमारती पूर्ण होऊनही अद्याप रुग्णसेवा सुरू झालेली नाही. रुग्णालयाच्या गरजेनुसार अंतर्गत रचना आणि बांधकाम झाले नसल्याचे निदर्शनास आल्याने आता या इमारतींमधील काही बांधकाम तोडून नव्याने काम करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या इमारती वापराविना धूळ खात पडल्या असून, या प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महिलांना आणि बालकांना मोठा दिलासा मिळेल ही अपेक्षा होती.

गरोदर महिला, माता आणि बालकांना विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमार्फत माता-बाल रुग्णालये चालविली जातात. सध्या बेलापूर, नेरूळ आणि ऐरोली येथे तीन माता-बाल रुग्णालये कार्यरत आहेत, तर वाशी येथे प्रथम संदर्भ रुग्णालय आहे. या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे आणि दिघा येथील रुग्णालये सुरू झाल्यास स्थानिक महिलांना आणि बालकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती.

महापालिकेच्या प्रशासकीय काळात कोपरखैरणे आणि दिघा परिसरातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या स्वतंत्र माता-बाल रुग्णालयांच्या इमारती पूर्ण होऊनही अद्याप रुग्णसेवा सुरू झालेली नाही. रुग्णालयाच्या गरजेनुसार अंतर्गत रचना आणि बांधकाम झाले नसल्याचे निदर्शनास आल्याने आता या इमारतींमधील काही बांधकाम तोडून नव्याने काम करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या इमारती वापराविना धूळ खात पडल्या असून, या प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *