मान्सूनने वाढवली चिंता! फक्त ‘या’ दोन जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा, तर, उर्वरित राज्यात…

सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. पण या महिन्यातही पाऊस कमीच असणार आहे. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाकडून आशा असतानाच हवामान विभागाकडून चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमीच असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. तर मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून पतियाला, नजीबाबाद येथे ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला होता. उत्तर प्रदेशापासून कमी दाब क्षेत्रापर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कायम असतानाच दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड ते कमी दाबाचे केंद्र या दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *