कारच्या धडकेत मुंबईकर विवाहितेचा मृत्यू, अंत्यदर्शनाला पती व्हिलचेअरवर आला, चिमुरड्या लेकरांचा टाहो, उपस्थितांच्या काळजाचं पाणी

महाराष्ट्र सदन घोट्याळ्यात आरोप झालेले आणि नंतर दोषमुक्त झालेले कृष्णा चमणकर (७१) यांना कार अपघात प्रकरणी अटक करण्यात आली आहे. चमणकर यांनी मालाड येथे रविवारी रात्री बेदरकारपणे कार चालवत एक दुचाकी आणि काही रिक्षांना धडक दिली. त्यात दुचाकीवरील प्रियांका सत्रा (३४) या वकील महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती मयांक सत्रा आणि रिक्षांतील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रकरणी चमणकर यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

व्हिलचेअरवरुन पती अंत्यदर्शनाला

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जखमी अवस्थेतील मयंक सत्रा यांना रुग्णालयातून व्हीलचेअरवरून घरी आणण्यात आले, जेणेकरुन अंत्यसंस्कारापूर्वी ते पत्नी प्रियांका हिचे अखेरचे दर्शन घेऊ शकतील. ‘इमिटेशन ज्वेलरी’चा व्यवसाय करणारे मयांक अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. प्रियांका यांच्या पश्चात पतीसह आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *