अवघ्या 5 महिन्यात मोडलं रॅपर बादशाहचं दुसरं लग्न! ईशा रिखी सोबत घेतला घटस्फोट

बॉलिवूडचा स्टार गायक आणि रॅपर बादशाह हा मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आला आहे. रॅपर बादशाहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तो दुसरी पत्नी ईशी रिखी सोबत नात्यातून वेगळं होत असून त्यांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले. अवघ्या 5 महिन्यांपूर्वी रॅपर बादशाह आणि ईशी रिखी यांनी विवाह केला होता.

अवघ्या 5 महिन्यात मोडलं लग्न : 

रॅपर बादशाह आणि ईशा रिखीने 31 ऑगस्ट सोमवारी रात्री उशिरा आपल्या ऑफिशल इंस्टाग्राम हॅण्डलवरून संयुक्तपणे पोस्ट शेअर करून घटस्फोटाची घोषणा केली. बादशाह आणि ईशा रिखी यांनी हा निर्णय दोघांच्याही सहमतीने घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या प्रायव्हसीचा सन्मान करण्याची अपील केली आहे. आता दोघांचे मार्ग वेगळे झाले असून ते आपल्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरु करणार आहेत.

रॅपर बादशाहने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, ‘ईशा रिखी आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आणि आपापल्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय परस्पर आदरापोटी घेण्यात आला असून, या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी आम्ही सर्वांना विनंती करतो’.

ईशा रिखी हिने सुद्धा आपली बाजू मांडताना सांगितलं की, ‘दोघांनी आपसात सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे’. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ईशा ही बादशाहची दुसरी पत्नी आहे आणि या जोडप्याने या वर्षी 26 मार्च 2026 रोजी एका खाजगी समारंभात विवाह केला.

नात्यात आला दुरावा : 

बादशाह आणि ईशा रिखी यांच्या लग्नाच्या काहीच महिन्यांनी दोघांमध्ये भांडण सुरु झालेली. दोघांमध्ये दुरावा आला होता. ईशा रिखीने मागील काही काळात सोशल मीडियावर लागोपाठ काही पोस्ट शेअर केले होते जे पाहून अंदाज लावला जात होता की बादशाह सोबतच्या लग्नाच्या नात्यात सगळं काही ठीक नाही. आता घटस्फोटाच्या या बातमीनंतर या सगळ्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

2020 मध्ये झाला पहिला घटस्फोट : 

बादशाहचं पहिलं लग्न हे 2012 मध्ये जॅस्मिन मसीह सोबत झालं होतं. लग्नाच्या काही वर्षांनी त्या दोघांना मुलगी झाली. ज्याचं नाव जेसी ग्रेस मसीह सिंह असं आहे. मात्र 2020 मध्ये बादशाह आणि जॅस्मिनचा घटस्फोट झाला. बादशाहने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘मी हे नातं वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. मी त्या नात्याला सगळं काही दिलं होतं’. पण अखेर बादशाह आणि जॅस्मिनला वेगळं व्हावं लागलं कारण ते नातं त्यांच्या मुलीसाठी योग्य नव्हतं. बादशाहची पहिली पत्नी जॅस्मिन आणि मुलगी या दोघी लंडनला रवाना झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *