1 सप्टेंबर रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या खिशाला महागाईची झळ बसली आहे. महानगर गॅस लिमिटेड MGAL आणि मुंबई महानगर क्षेत्र MR ने CNG आणि PNG च्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन, कंपन्यांनी CNG च्या दरात प्रति किलो 2 रुपये आणि PNG च्या दरात प्रति किलो 1 रुपयाने वाढ केली आहे.
मुंबईतमध्ये वाढलेल्या दरानंतर आता CNG ची नवीन किंमत ही 88 रुपये प्रति किलोग्राम आणि PNG दर 53 रुपये प्रति एससीएम आहे. एमजीएलच्या म्हणण्यानुसार पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे ही दरवाढ आवश्यक झाली आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय निर्देशांकांशी निगडित इनपुट गॅसच्या किंमतीत थेट वाढ झाली आहे.
महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमधील CNG दर :
मुंबई : 88 रुपये प्रति किलो
ठाणे : 88 रुपये प्रति किलो
नवी मुंबई : 88 रुपये प्रति किलो
पुणे : 97.75 रुपये प्रति किलो
नाशिक : 98.50 रुपये प्रति किलो
रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ :
मुंबई महानगर क्षेत्रात प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला सुद्धा झळ बसली आहे. ऑटो रिक्षांचे किमान भाडे 27 रुपयांपर्यंत आणि काळ्या पिवळ्या टॅक्सींचे किमान भाडे 33 रुपयांपर्यंत वाढले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने भाड्यातील या वाढीस मंजुरी दिली आहे. ऑटो रिक्षांच्या भाड्यात वाढ करण्यात आली असून, टॅक्सीच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ झाली आहे.
मे महिन्यात वाढल्या होत्या किंमती :
मे महिन्यात देशांतर्गत गॅसचे कमी वाटप आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे गॅस खरेदीचा वाढलेला खर्च, या कारणांचा हवाला देत MGL ने CNG चे दर 86 प्रति किलो आणि PNG चे दर 52 प्रति SCM पर्यंत वाढवले. दरम्यान MGL ने स्पष्ट केले की, ते गॅस खरेदीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्याचे मार्ग शोधणे आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून PNG चा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यास प्रोत्साहन देणे सुरूच ठेवतील.
