महिन्याच्या पहिल्या दिवशीच LPG सिलेंडर महागला! इतक्या रुपयांनी वाढले दर

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा फटका बसला आहे. 1 सप्टेंबर रोजीच LPG गॅस सिलेंडर वापरकर्त्यांवर महागाईची कुऱ्हाड चालली असून तेल मार्केटिंग कंपन्यांनी LPG सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत.  IOCL च्या सांगण्यानुसार 19 किलोच्या LPG सिलेंडरच्या किंमती या 9.50 रुपयांपर्यंत वाढल्या आहे. 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किंमतींमध्ये मात्र वाढ झालेली नाही.

5 किलो आणि 10 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. 5 किलोचा लहान LPG गॅस सिलेंडर हा अजूनही 349.50 रुपयांना मिळतोय. तर XTRALITE च्या किंमती सुद्धा 339 रुपयांवर स्थिर आहेत. 5 किलो नॉन-डॉमेस्टिक सिलेंडरबाबत बोलायचं झालं तर याची किंमत ही 762 रुपयांवरून 764 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांमधील LPG गॅस सिलेंडरच्या किंमती : 

आजपासून 19 किलोच्या LPG सिलेंडरच्या किंमती 9.50 रुपयांनी महागला असून आता त्याची किंमत ही 2747.50 रुपये झाली आहे. कालपर्यंत याची किंमत ही 2,738 रुपये एवढी होती.

मुंबईत 1 सप्टेंबर रोजी व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत ही 2,701 रुपये झाली आहे. या गॅस सिलेंडरची किंमत आधी 31 ऑगस्टपर्यंत 2691.50 रुपये होती.

नोएडामध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत ही 2,738 रुपयांनी वाढून 2,747.50 इतकी झाली आहे. यात 9.50 रुपयांची वाढ झालेली आहे.

कोलकातामध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किंमती या 2872.50 रुपयांनी वाढून 2,982 रुपये झाल्या आहेत. LPG सिलेंडरच्या किंमतीत 9.50 रुपयांची वाढ झाली आहे.

चेन्नईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती या 2916.50 रुपये आहेत. 31 ऑगस्टपर्यंत गॅस सिलेंडरची किंमत ही 2,906 रुपये एवढी होती.

ऑगस्टमध्ये कमी झाल्या होत्या किंमती : 

एक ऑगस्ट रोजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये 192 रुपयांपर्यंतची घट झाली आहे. त्या वेळी दिल्लीत त्याची किंमत 2930 वरून 2738  पर्यंत कमी झाली होती. त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच 1 जुलै 2026 रोजी 19 किलोच्या सिलिंडरच्या किमतीतही 183.50 ची कपात करण्यात आली होती. तरीही घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *