सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. गुजरातच्या सूरत आणि बिलिमोरादरम्यान 50 किमीपर्यंत पहिला टप्पा धावणार आहे. गुजरातमध्ये वेगाने बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून 15 ऑगस्ट 2027 ला पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन धावणार आहे. तर या हाय स्पीड ट्रेनचे रूळ विस्तारीकरण आणि रेल्वे स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. तर अलीकडेच एक्सवर साबरमती रेल्वे स्थानकाचा व्हिडिओ समोर आला आहे. एअरपोर्टलाही टक्कर देईल असं स्टेशन बांधण्यात आलं आहे.
साबरमती बुलेट ट्रेन स्थानकाचा लूक खूपच सुंदर आहे. या स्थानकाचा व्हिडिओ समोर आला असून तुम्हीदेखील हा लूक पाहून आश्चर्यचकित व्हाल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भातील कामाचे निरीक्षण करण्यासाठी अहमदाबाद रेल्वे मंडळाचे DRM वेद प्रकाश साबरमती बुलेट ट्रेन स्थानक आणि अल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब (MMTH) वर पोहोचले होते. या दरम्यान प्रकल्पाशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी , इंजिनिअर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी स्टेशन परिसर, पॅसेंजर, कॉर्नकोर्स, प्लॅटफॉर्म आणि मल्टी मॉडल हबसोबत जोडणाऱ्या मार्गाचेबी परीक्षण केले.
साबारमतीत तयार होणारे मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब बुलेट ट्रेन, भारतीय रेल्वेच्या साबरमती ब्रॉडगेज स्टेशन, अहमदाबाद मेट्रो आणि बीआरटीक्स बस सेवेला परस्पर जोडणार आहे. तसंच, प्रवाशांना ये-जा करण्यासाठी लिफ्ट, एस्केलेटर, तिकिटींग एरिया आणि पार्किंगची व्यवस्था असणार आहे.
साबरमती बिल्डिंगची शानदार इमारत तुम्ही पाहु शकता. सध्या ही इमारत 6 मजली इतकी आहे. यात अनेक अत्याधुनिक सुविधाही मिळणार आहेत. अहमदाबाद-मुंबई दरम्यान चालणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. सध्या रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम सुरू आहे.
