पुण्यात भाजपच्या बैठकीदरम्यान तुकाराम मुंढेंच्या FDA चा अचानक छापा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या…

तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध विभागाच्या आयुक्तपदावर आल्यानंतर महाराष्ट्रात त्यांनी धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. छोट्या मोठ्या हॉटेल, दुकानापासून ते मंत्रालय, कोर्टापर्यंत तुकाराम मुंढेंच्या  FDA ने एकही ठिकाणी सोडलं नाहीय. अशातच आज पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान FDA पथकाने अचानक एन्ट्री मारली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वारगेट इथे गणेश कला क्रीडा केंद्रात भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

याच बैठकीतील उपस्थितीत पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जेवणाची FDA पथकाकडून अचानक तपासणी करण्यात आली. FDAच्या चार कर्मचाऱ्यांनी बैठकीच्या ठिकाणी पोहोचून जेवणाचे नमुने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *