ठाण्यात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पोहायला गेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पहिली दुर्घटना ही मुंबई-नाशिक महामार्गाजवळ असलेल्या रेतीबंदर परिसरातील खाडीत पोहायला गेलेवल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या घटनेत भिवंडी तालुक्यातील अकलोली परिसरातील तानसा नदीतही अशीच घटना घडली. आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
