रविवार ठरला ठाणेकरांचा ‘मॅरेथॉन डे’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह तारे- तारकांची हजेरी

तब्बल सहा वर्षांनी ठाणे महानगरपालिकेत महापौर,पदाधिकारी व नगरसेवक विराजमान झाल्यानंतर रविवारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. या स्पर्धेत अबालवृद्धांनी सहभागी होत धावण्याचा आनंद घेतला.

३० हजार स्पर्धकांचा सहभाग

स्पर्धेत सुमारे ३० हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पुरुष गटात कोल्हापूरचा प्रवीण कांबळे,तर महिला गटात नाशिकची रवीना गायकवाड यांनी अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे,स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजप आमदार संजय केळकर व सिनेकलाकारांनी स्पर्धेत धाव घेतली.

‘धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची’

‘धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची’ या घोषवाक्यासह ३२ वी ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्पर्धेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या ,तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवल.त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण १४ गटांतील स्पर्धेचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला.

धावपटूंचा गौरव

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाजप आमदार संजय केळकर व इतर लोकप्रतिनिधींसह मॅरेथॉनमध्ये धाव घेतली. महापौर शर्मिला पिंपळोलकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक , खासदार नरेश म्हस्के , आमदार रवींद्र फाटक,आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले.

तारे – तारकांची हजेरी

स्पर्धेत सिनेकलावंत मंगेश देसाई, गश्मीर महाजनी ,किशोरी आंबिये, ऐश्वर्या नारकर, अभिज्ञा भावे , हरीश थोरात, स्वराज नागांवकर, शिवानी सोनार, विजया बाबर, निखिल दामले, रोहित परशुराम, ट्विंकल यादव, दक्षता जुईल, अनुज साळुंखे , प्रतीक्षा शिवणकर , तनुष्का विशेल ,चेतन गौरव,समीर परांजपे आणि अनघा ठाकूर उपस्थित होते. कलाकारांनी स्पर्धेकांचा उत्साह वाढवत एक किलोमीटर स्पर्धेत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *