दोन महिन्यापूर्वीच हिंगोलीत बदली, PSI अमोल गंगलवाड यांनी वर्दीवरच आयुष्य संपवलं; कारण अद्याप अस्पष्ट

येथील खटकाळी बायपास भागात रेल्वेसमोर उडी घेऊन एका पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी रोजी घडली आहे. या दुर्दैवी घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. ​अमोल विठ्ठलराव गंगलवाड (वय 40) असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. हिंगोलीतील खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज शनिवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्णाकडून अकोल्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेसमोर उडी घेऊन अमोल गंगलवाड यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अंगावरील खाकी गणवेशावरच हे टोकाचं पाऊल उचललं.

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

​रेल्वे कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवलं. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पोलीस उपनिरीक्षक संजय मार्के, शेख अजमत आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ​मृत अमोल गंगलवाडहे हिंगोली येथील पोलीस नियंत्रण कक्षात सेवेत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *