सहा कैद्यांचा कारागृह शिपायावर हल्ला; अधीक्षकांच्या संचार फेरीवेळी धुडगूस, काय घडलं?

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक अरुणा मुगुटराव यांच्या संचारफेरीवेळी बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने सहा न्यायाधीन बंद्यांनी कर्तव्यावरील कारागृह शिपायाला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी (दि. २७) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडला. या हल्ल्यात कारागृह शिपाई खाली पडले. त्यानंतरही आक्रमक झालेल्या बंद्यांनी त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

कारागृह शिपाई नितीन अंबादास हेमके यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शुभम शहाराम लोखंडे, रोहित ऊर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर, अविनाश नानाजी उशीरे, अनिल विष्णू रेडेकर, सागर मधुकर गरड आणि अनिकेत विजय सोमवंशी या सहा न्यायाधीन बंद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *