रविवारी तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या विद्याविहार-ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर तसंच ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यानच्या अप-डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळं काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार असून, ट्रान्स-हार्बरवरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.
मेगाब्लॉकचे वेळापत्रक कसे असेल?
मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी 8 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांना जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
ट्रान्स-हार्बर सेवा साडेपाच तास बंद
ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यानच्या अप-डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यानच्या ट्रान्स-हार्बर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहतील.
ठाण्याहून वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर लोकल सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत बंद राहतील, तर पनवेल, नेरुळ आणि वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर लोकल सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहेत. दरम्यान, बेलापूर-उरण मार्गावरील लोकल सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार नियमित धावणार आहेत.
खालील ‘डाऊन’ मेल आणि एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर ‘डाऊन जलद’ मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानकावर पुन्हा 5 व्या मार्गावर वळवल्या जातील; ब्लॉक कालावधीत त्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिरा धावतील.
• गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर गोदान एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस आणि
• गाडी क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस -काकिनाडा पोर्ट एक्सप्रेस
ब्लॉक कालावधीत खालील ‘अप’ मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर ‘अप’ जलद मार्गावर वळवल्या जातील आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर वळवल्या जातील; परिणामी त्या आपल्या गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
• गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12134 मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 13201 राजगीर – लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 17221 काकिनाडा पोर्ट – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
• गाडी क्रमांक 12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल आणि
• गाडी क्रमांक 12812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
ट्रान्स-हार्बर लाईन
ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा बंद राहतील. सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील. सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाणे येथे येणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील. बेलापूर-उरण मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावतील.
