महाराष्ट्र हादरला! 21 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, नराधमाने विद्यार्थिनीला एकट गाठलं अन्…

शहापूर येथे एक भयानक घटना उघडकीस आली आहे.  तब्बल 21 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षितेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेताचाही गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून आश्रमशाळांमध्ये विविध उपाययोजना केल्या जात असताना ठाणे जिल्ह्यतील शहापूर तालुक्यातील एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तब्बल 21 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.

विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी आश्रम शाळेतील स्वयंपाक्याचा मदतनीस म्हणून काम करणाऱ्या नराधम कर्मचाऱ्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे विद्यार्थिनींच्यासाठीची सुरक्षा यंत्रणा नेमकी करते काय, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे. गणपत गवळी असं अटक केलेल्या आरोपी कर्मचाऱ्याचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील टेंभा गावाच्या हद्दीत शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच कर्मचाऱ्याने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला असल्याची माहिती बुधवारी समोर आली. या कर्मचाऱ्याला टेंभा येथील शासकीय आश्रमशाळेत पाठवण्यात आलं होतं. शहापूर तालुक्यातील टेंभा आश्रम शाळेची एकच इमारत असून दुसऱ्या मजल्यावर मुले, तिसऱ्या मजल्यावर मुलींचं वसतीगृह असून या मुली कपडे धुण्यासाठी तसंच जेवण करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून खाली ये जा करतात. या दरम्यान कर्मचारी आरोपी गवळी गणपत झिपरू हा विद्यार्थिनींना सारखा त्रास देत असे. त्यानं 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला एकटी गाठून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

या पीडित विद्यार्थिनीनं घडलेली हकीकत अधीक्षकांना सांगितली. त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यात पीडित मुलींसह अधीक्षकांनी धाव घेऊन आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 354 तसंच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या कर्मचाऱ्याला अटक करून आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *