बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन तरुणीचा थेट मृतदेहच घरी आला, शेजारी बसून येशूची प्रार्थना अन्…

प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा थेट मृतदेहच घरी परतल्याने पालघर मध्ये खळबळ उडाली आहे. अल्पवयीन तरुणीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी प्रियकरावर तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान यासंदर्भात कासा पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद झाली असून सध्या कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय अंजू विष्णू कडू ही मुलगी मागील आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली होती. मात्र दोन दिवसांनी अंजू हिच्या कुटुंबीयांना फोन आला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. फिरण्यासाठी गेलेल्या अंजूचा मृत्यू झाल्याचा फोन कुटुंबियांना आला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अंजूची प्रकृती खालावल्यानंतर तिला रुग्णालयात व नेता तिच्या शेजारी बसून येशूची प्रार्थना करण्यात वेळ घालवला असल्याचा आरोप देखील यावेळी मृत अंजूच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. अंजू चा मृत्यू हा घातपात असून तिच्या प्रियकरासह या सगळ्यात दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी खोलवर तपास करण्याचे म्हटले आहे. सध्या शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *