2026 वर्षातील सर्वात मोठं संकट आले आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहात एकाचवेळी 1000 पेक्षा जास्त लोक वाहून गेले आहेत. 400 भविकांशी संपर्क तुटला आहे. नेपाळ-चीन सीमेवरील रसुवा जिल्ह्यात बुधवारी भीषण पूर आणि भूस्खलनामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे.
नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयाचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ समोर आले आहेत. या आपत्तीमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कैलास मानसरोवर यात्रेला निघालेले सुमारे 400 यात्रेकरू रसुवागढी परिसरात अडकले आहेत. त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. काठमांडूस्थित ‘टच कैलास ट्रॅव्हल्स अँड टूर्स’चे व्यवस्थापकीय संचालक बासू कुमार अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली.
93 नेपाळी नागरिकांसह एकूण 390 यात्रेकरू बुधवारी सीमा ओलांडून चीनमध्ये जाणार होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत यापैकी केवळ काही जणांशी संपर्क होऊ शकला आहे. तर बहुतांश यात्रेकरूंविषयी कोणतीही अचूक माहिती मिळालेली नाही. या यात्रेकरूंनी विविध ट्रॅव्हल एजन्सींमार्फत प्रवासाला सुरुवात केली होती, ज्यामध्ये सम्राट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे 71, ट्रेकर्स सोसायटीचे 92, हिमालयन ग्लेशियरचे 62, लीफ हॉलिडेजचे 5, कैलास जर्नीचे 31, फिशटेल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे 27, काठमांडू हॉलिडेजचे 17, अल्पाइन इको ट्रेकचे 16, रिचा टूर्सचे 12 आणि एक्सप्लोर व्हॅकेशन्सचे सात जण सामील होते. बाधित क्षेत्रात अडकलेल्या यात्रेकरूंशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या स्थितीचा अचूक अंदाज घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे नेपाळ ट्रेकिंग एजन्सी असोसिएशनचे अध्यक्ष सागर पांडे यांनी सांगितले.
अचानक नदीला पूर आला
तिबेटच्या सीमेपासून सुमारे 125 किमी अंतरावर पूर आला होता. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि जवळच्या स्याफ्रुबेसी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकाचवेळी शेकडो वाहने आणि हजारो लोक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीआरआरएमए) रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा येथील नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना पुढील सूचना मिळेपर्यंत अत्यंत सतर्क राहण्याचे आणि सुरक्षेची उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तिमुरे परिसरात तैनात असलेले सशस्त्र पोलीस दलाचे 9 कर्मचारी, 32 पोलीस यांच्यासह 41 सुरक्षा कर्मचारी बेपत्ता झालेत.. या पुरात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये… पुरामुळे बाजारपेठा, घरे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झालंय..
