साडेतीन तासात गर्लफ्रेण्डचे कारवर 3400 वेळा किस, सगळेच झाले हैराण, आता बॉयफ्रेण्ड ‘किंमत’ मोजतोय

शल मीडियावर व्हायरल होण्याचं वेड आणि रीलवर जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्याच्या नादात तरुणाने स्वतःच्या गाडीची ‘किसिंग कार’ बनवून टाकली. युवकाच्या गर्लफ्रेंडने संपूर्ण कारभर लिपस्टिकने किस केल्याचे निशाण बनवले होते. या कारचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करताच पाहता पाहता तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका दिवसात ५५ लाखांहून अधिक व्हयूज मिळाले. मात्र पोलिसांनी तरुणाला हे किसिंग साईन पुसायला लावत कारवाईचा बडगा उगारला आहे.

किसिंग कार पोलिसांनी पाहिली

पोलिसांनी सांगितलं की दोन दिवसांपासून एका कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. यामध्ये भरधाव वेगात एक कार रस्त्यावर धावताना दिसत आहे. पोलिसांनी निरखून पाहिलं तेव्हा गाडीच्या बॉडीवर लिपस्टिकचे निशाण पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गाडीच्या मालकाची ओळख पटवली. मध्य प्रदेशातील थाटीपूर भागातील रहिवाशाच्या नावे कार नोंदणीकृत असल्याची माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *