मुंबई पोलिसांतील काहीजण दाऊदसोबत : राजन

मुंबई पोलिसांतील काहीजण दाऊदसोबत : राजन

मुंबई पोलिसांनी माझ्यावर खूप अत्याचार केले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांवर माझा विश्वास नाही. मुंबई पोलिसांतील काही जण दाऊदसोबत काम करत असल्याचा खळबळजनक आरोप कुख्यात गुंड छोटा राजन याने केला आहे.
 
बाली येथे अटक झालेल्या राजनला ताब्यात घेण्यासाठी हस्तांतरण कायद्याअंतर्गत असलेली औपचारिकता पाळण्याची गरज नसून त्याला थेट तिथे गेलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल आणि आजच (मंगळवार) विमानातून भारताकडे रवाना केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. छोटा राजनला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय, मुंबई पोलिस आणि दिल्ली पोलिसांचे पथक येथे दाखल झाले आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. 
 
त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना राजन म्हणाला, की मुंबई पोलिसांतील काही जण दाऊद इब्राहिमशी संबंधित आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारने याकडे पाहून पुढील निर्णय घ्यावा. मला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. दाऊदला मी घाबरत नसून, त्याच्याविरोधातील माझा लढा यापुढेही सुरूच राहील. गेल्या 22 वर्षांपासून दाऊदविरोधात लढत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *