रशियन विमानाचा अपघातच, घातपात नाही

रशियन विमानाचा अपघातच, घातपात नाही

रशियातील प्रवासी विमान इजिप्तमधील सिनाई भागात कोसळून झालेल्या अपघातात विमानातील सर्व प्रवासी व विमान कर्मचारी यांचा मृत्यू झाला. रशियाचे हे विमान इसिसच्या दहशतवाद्यांनी पाडल्याचा अंदाज काही माध्यमांनी व्यक्त केला होता.

मात्र हे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण इजिप्तच्या सरकारने दिले आहे. विमान कोसळण्याआधी वैमानिकाने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सिनाई हवाई नियंत्रण विभागाशी संपर्क साधून कळवले होते, असे इजिप्तमधील एका अधिका-याचे म्हणणे आहे. त्यामुळे रशियन विमानाचा घातपात नसून अपघातच झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

रशियातील कोगालिमाव्हिया या विमान कंपनीचे एअरबस ए ३२१ (७ के ९२६८) हे विमान इजिप्तमधील शर्म अल शेख येथून रशियाकडे जात होते. उड्डाणानंतर २३ मिनिटांतच हे विमान रडारवरून दिसेनासे झाले. शिवाय विमानाशी काही संपर्कही झाला नाही.

विमानातील बहुतेक प्रवासी हे रशियन नागरिक होते. विमान कोसळल्याच्या घटनेला इजिप्त सरकारने दुजोरा दिला असून सिनाईतील पर्वतांमध्ये विमानाचे अवशेष मिळाले असून प्रवाशांचे मृतदेहही सापडले आहेत.

तांत्रिक कारणामुळेच हे विमान कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, रशिया सरकारने कोगालिमाव्हिया या विमान कंपनीविरुद्ध सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, २००१ मध्ये याच विमानाच्या शेपटीला अपघात झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *