ब्रेनडेड तरुणाच्या कुटुंबाचं दातृत्व, 25 मिनिटांचा ग्रीन कॉरिडॉर, 17 वर्षीय मुलावर वाडियात हृदयप्रत्यारोपण, तीन तासात पुन्हा धडधड

गंभीर हृदयविकारामुळे जीवघेण्या वैद्यकीय गुंतागुंतीचा सामना करणाऱ्या १७ वर्षीय मुलावर बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात यशस्वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. योग्य दात्याचे हृदय उपलब्ध झाल्यानंतर, ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने मुलुंड येथील खासगी रुग्णालयातून ते अवघ्या २५ मिनिटांत वाडिया रुग्णालयात आणण्यात आले.

गंभीर अवस्थेत वाडियात दाखल

घणसोली येथे राहणाऱ्या समीरला (नाव बदलले आहे) मागील वर्षी १ डिसेंबर रोजी वाशी येथील रुग्णालयात डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा हृदयविकार असल्याचे निदान झाले. पाच दिवसांच्या उपचारांनंतर त्याला घरी सोडण्यात आले; मात्र आठवडाभरातच धाप लागणे, छातीत दुखणे आणि तीव्र थकवा अशी लक्षणे पुन्हा दिसू लागली. प्रकृती खालावल्याने १५ डिसेंबर रोजी त्याला गंभीर अवस्थेत बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल करण्यात आले. बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू झाले.

डायलेटेड कार्डिओमायोपॅथीमध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे शरीराच्या गरजेनुसार रक्तपुरवठा करण्याची हृदयाची क्षमता कमी होते आणि पुढे हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. समीरच्या हृदयाची कार्यक्षमता अत्यंत कमी झाल्याने त्याच्यासाठी हृदयप्रत्यारोपण हाच पर्याय असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीमार्फत त्याचे नाव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत नोंदवण्यात आले.

लहान रुग्णांबाबत आव्हानं

लहान मुले आणि किशोरवयीन रुग्णांसाठी योग्य आकाराचे हृदय मिळवणे हे मोठे आव्हान असते. रक्तगटासह दाता आणि रुग्णाचे वय, वजन आणि शरीराचा आकार यांचा विचार केला जातो. ६ ऑक्टोबर रोजी मुलुंड येथील खासगी रुग्णालयात योग्य दाता उपलब्ध असल्याची माहिती ‘वाडिया’च्या वैद्यकीय पथकाला मिळाली. ब्रेनडेड झालेल्या २२ वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि ‘झेडटीसीसी’च्या नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे हृदय समीरच्या प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाले.

ग्रीन कॉरिडोरमुळे २५ मिनिटांत प्रवास

दात्याच्या शरीरातून हृदय काढल्यानंतर ते सुरक्षितरीत्या जतन करून शक्य तितक्या कमी वेळेत प्रत्यारोपणासाठी पोहोचवणे आवश्यक असते. ग्रीन कॉरिडॉरमुळे मुलुंड ते वाडिया रुग्णालय हे २३.९ किलोमीटर अंतर २५ मिनिटांत पार करण्यात आले. दात्याचे हृदय काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ‘वाडिया’तील डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रियेची तयारी पूर्ण केली. प्रत्यारोपणादरम्यान हृदयाशी जोडल्या जाणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्या काळजीपूर्वक जोडण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यारोपित हृदयाने कार्य सुरू केले. दात्याचे हृदय थांबल्यापासून समीरच्या शरीरात प्रत्यारोपित हृदय पुन्हा धडधडू लागेपर्यंत सुमारे तीन तासांचा कालावधी गेला.

निधी संकलित करून प्रत्यारोपण

समीरचे वडील बसचालक, तर आई गृहिणी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या महागड्या उपचारांचा खर्च उचलणे त्यांच्यासाठी कठीण होते. निधी संकलनातून प्रत्यारोपणाचा खर्च भागवण्यात आला.

‘वाडिया रुग्णालयातील विशेष उपचार केंद्रात सध्या सुमारे ३०० मुलांवर उपचार सुरू आहेत. हृदयप्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी रुग्णालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत,’ असे वाडिया बालरुग्णालयाच्या मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.डायलेटेड कार्डिओमायोपॅथीमध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे शरीराच्या गरजेनुसार रक्तपुरवठा करण्याची हृदयाची क्षमता कमी होते आणि पुढे हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. समीरच्या हृदयाची कार्यक्षमता अत्यंत कमी झाल्याने त्याच्यासाठी हृदयप्रत्यारोपण हाच पर्याय असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीमार्फत त्याचे नाव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत नोंदवण्यात आले.

लहान रुग्णांबाबत आव्हानं

लहान मुले आणि किशोरवयीन रुग्णांसाठी योग्य आकाराचे हृदय मिळवणे हे मोठे आव्हान असते. रक्तगटासह दाता आणि रुग्णाचे वय, वजन आणि शरीराचा आकार यांचा विचार केला जातो. ६ ऑक्टोबर रोजी मुलुंड येथील खासगी रुग्णालयात योग्य दाता उपलब्ध असल्याची माहिती ‘वाडिया’च्या वैद्यकीय पथकाला मिळाली. ब्रेनडेड झालेल्या २२ वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि ‘झेडटीसीसी’च्या नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे हृदय समीरच्या प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाले.

 

ग्रीन कॉरिडोरमुळे २५ मिनिटांत प्रवास

दात्याच्या शरीरातून हृदय काढल्यानंतर ते सुरक्षितरीत्या जतन करून शक्य तितक्या कमी वेळेत प्रत्यारोपणासाठी पोहोचवणे आवश्यक असते. ग्रीन कॉरिडॉरमुळे मुलुंड ते वाडिया रुग्णालय हे २३.९ किलोमीटर अंतर २५ मिनिटांत पार करण्यात आले. दात्याचे हृदय काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ‘वाडिया’तील डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रियेची तयारी पूर्ण केली. प्रत्यारोपणादरम्यान हृदयाशी जोडल्या जाणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्या काळजीपूर्वक जोडण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यारोपित हृदयाने कार्य सुरू केले. दात्याचे हृदय थांबल्यापासून समीरच्या शरीरात प्रत्यारोपित हृदय पुन्हा धडधडू लागेपर्यंत सुमारे तीन तासांचा कालावधी गेला.

निधी संकलित करून प्रत्यारोपण

समीरचे वडील बसचालक, तर आई गृहिणी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या महागड्या उपचारांचा खर्च उचलणे त्यांच्यासाठी कठीण होते. निधी संकलनातून प्रत्यारोपणाचा खर्च भागवण्यात आला.

३०० मुलांवर उपचार

‘वाडिया रुग्णालयातील विशेष उपचार केंद्रात सध्या सुमारे ३०० मुलांवर उपचार सुरू आहेत. हृदयप्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी रुग्णालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत,’ असे वाडिया बालरुग्णालयाच्या मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *