यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी आणि पालकांची आनंदी बातमी आहे. लवकरच दिवाळी येणार आहे, अशातच यंदा शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या कधी आहे, याबद्दल ठरलं आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने परिपत्रक जारी करुन दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीनिमित्त किती सुट्ट्या असणार आहे जाणून घ्या. या सुट्ट्यांची नोंद घेऊन पालक हे मुलांसोबत आणि शिक्षक आपल्या कुटुंबासोबत सुट्टीचे नियोजन करणे सोपं होईल.

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दिवाळीची सु्ट्टी ही सोमवारी 2 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होईल. म्हणजे 31 ऑक्टोबर 2026 शनिवार आहे, ज्या शाळांना शनिवारची सुट्टी असते. त्यांना ऑक्टोबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत शाळेला जायचं आहे. त्यानंतर मुलांना शाळेत थेट 16 नोव्हेंबर 2026 ला सोमवारी जायचं आहे. शिक्षण विभागाने 14 नोव्हेंबर 2026 पर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. 15 नोव्हेंबर 2026 ला  रविवार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना यंदा दिवाळीची सुट्टी तब्बल 15 दिवस असणार आहे. तर दिवाळीनंतर शाळेचे दुसरं सत्र हे शनिवार 1 मे 2027 पर्यंत असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *