सहल, धरण अन्…शाळेकरी मुलींसोबत नग्न अवस्थेत अंघोळ करताना मुख्याध्यापकाचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून…

राजस्थानमधील अलवरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्यामुळे मुलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न पुन्हा एका ऐरणीवर आला आहे. एका सरकारी शाळेतील 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सहल काढण्यात आली. मुलींना पोहण्याचे धडे देण्याच्या नावाखाली मुलांना सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका धरणावर नेण्यात आलं. तिथे घडलेल्या प्रकाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापची लाट पसरली आहे.

या व्हिडीओमध्ये शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थिनींसोबत धरणाच्या पाण्यात कपडे न घालता अंघोळ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी शाळेत जाऊन जाब विचारला. एवढंच नाहीतर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागानेही या व्हिडीओ पाहून मुख्याध्यापकाबद्दल चौकशी सुरू केली. तसंच विभागाने आता मुख्याध्यापकांना तात्काळ प्रभावाने निलंबितदेखील केलं आहे.

अलवरच्या थानागाझी परिसरातील सरकारी शाळेचा तो मुख्याध्यापक आहे. 15 ऑगस्टला शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम पार पडला. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर, शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना जंगलातून सुमारे दोन किलोमीटर दूर असलेल्या भाडज धरणावर घेऊन गेला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मुलांना सहलीवर नेले जाईल आणि पोहण्याचे धडे दिले जातील, असे सांगण्यात त्या मुख्याध्यापकाने सांगितलं होतं. या धरणावर 20 ते 25 मोठ्या विद्यार्थिनीदेखील उपस्थित होत्या, अशी माहिती मिळते.

पुढे जे घडले त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला आणि गावात चर्चेचा विषय बनला. शिक्षण विभागाने जारी केलेल्या एका आदेशात म्हटलंय की, थानागाझी येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य विद्यार्थिनींसोबत धरणात अंघोळ करत असल्याचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विभागाने प्रथमदर्शनी हे प्राचार्यांसाठी असलेल्या नैतिक आचारसंहितेच्या नियमांच्या विरुद्ध असल्याचे मानले आहे. या आधारावर, प्राचार्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कालावधीत, प्राचार्यांचे मुख्यालय बिकानेर येथे असेल.

पोलीस आणि शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. थानागाझी पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकुमार मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकांचा जबाब नोंदवला. अद्याप कोणत्याही विद्यार्थी, पालक किंवा विद्यार्थ्याकडून लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *