मुंबई शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या स्टाफसाठी गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T- 2 परिसरातील इमारतीवरून उडी मारून (Crime News) ही आत्महत्या केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीवन संपवण्यापूर्वी अर्धा तासापूर्वी ड्रायव्हर एअरपोर्टमध्ये खाली गाडी पार्क करून वरती चढला होता. त्यानंतर इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आहे. या धक्कादाय घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. (Mumbai Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, या ड्रायव्हरच अंदाजे वय 50 ते 52 वर्ष आहे, हायकोर्टाच्या स्टाफला हायकोर्ट ते एअरपोर्ट पिकअप आणि ड्रॉप करण्यासाठी ते गाडी चालवत होते. मात्र, आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? हे अद्याप कळू शकलं नाही. यासंदर्भात सध्या सहार पोलिसांनी नोंद करत सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास सुरु केला आहे. तर हायकोर्टाच्या ड्रायव्हरने आत्महत्या केल्यामुळे सध्या एअरपोर्ट परिसरात प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.
