मुंबईतील McDonald’s सह बॉम्बे प्रेसिडन्सी रेडिओ क्लब लिमिटेडचे लायसन्स रद्द, 13 प्रसिद्ध रेस्टॉरंट्वर FDA ची मोठी कारवाई

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे FDA ने मुंबईतील प्रसिद्ध कुलाबा परिसरातील अनेक 13 प्रसिद्ध रेस्टॉरंट्वर FDA ची मोठी कारवाई केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या FDA ने मॅकडोनाल्ड्सच्या किऑस्कसह रेडिओ क्लब, स्टेटस रेस्टॉरंट आणि अन्य 13 रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

कुलाब्यातील बॉम्बे प्रेसिडन्सी रेडिओ क्लब लिमिटेडवर तपासादरम्यान स्वयंपाकघरात माशांचा वावर, मृत झुरळ आणि भांडी धुण्याच्या ठिकाणी कॉक्रोच ट्रॅप आढळून आले होते. तपासणीत तब्बल 47 टक्के नियमांचे पालन झाले नसल्याचे तपासात समोर आलंय.

नॉन-व्हेज पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा फ्रिजही अस्वच्छ असल्याचे तपासात आढळून आलं आहे. फ्रोजन फूड्सच्या तापमान नियंत्रणाबाबतही त्रुटी दिसून आल्यामुळे अधिकारीही हे चित्र पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. कर्मचाऱ्यांचे घामाने भिजलेले हेल्मेट आणि कपडे खाद्यपदार्थांच्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचेही धक्कादायक वास्तव या तपासामध्ये दिसून आलं. किचनचा दरवाजा व्यवस्थित बंद होत नसल्याचे दिसून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे स्टोव्हच्या जवळच कचरापेटी ठेवण्यात आली होती. एवढंच नाहीतर परिसरात थुंकल्याचे डागही दिसून आले आहेत.

तपासणीदरम्यान हात न धुता अन्नपदार्थांना स्पर्श केल्याचे दिसून आले आहेत. या उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर एफडीएकडून FSS Act, 2006 च्या कलम 32(3) अंतर्गत क्लबचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. निलंबनाच्या काळात खाद्यपदार्थांची खरेदी, विक्री आणि वितरण करण्यास तात्काळ बंदी घातली आहे.

कुलाब्यातील मॅकडोनाल्ड्सच्या एका किऑस्कमध्ये 20 पैकी 18 अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्यात येत नसल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. तर धक्कादायक म्हणजे 148 पानांचा कथित खोटा शिस्तपालन रिपोर्ट त्यांनी दिला होता. तपासात असंही आढळून आलं की, मेन्यूमध्ये उल्लेख नसताना ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर करण्यात आला आहे. सर्व कायदेशीर आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईपर्यंत संबंधित किऑस्कचे अन्न आणि ड्रिंकचे उत्पादन, विक्री आणि वितरण बंद ठेवण्याचे आदेश एफडीएकडून देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *