मुंबई उच्च न्यायालयातील प्रोटोकॉल विभागातील एका चालकाने गुरुवारी दुपारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत्महत्या केली. प्रमोद जाधव असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव असून त्यांना काही दिवसांपूर्वीच कर्करोगाचे निदान झाले होते. त्या नैराश्यातून प्रमोद जाधव यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
गुरुवारी उच्च न्यायालयातील प्रोटोकॉल विभागात चालक पदावर कार्यरत असलेले प्रमोद जाधव आणि एक चालक मुंबई विमानतळावर कार्यरत होते. जाधव यांनी त्यांचे मुंबई विमानतळावरील व्हीआयपी पार्किगमध्ये पार्क केले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जाधव यांनी पी१० वरून उडी मारली. ते खाली लेव्हल १ वर पडले.
चौकशी दरम्यान प्रमोद जाधव उच्च न्यायालयाच्या प्रोटोकॉल विभागातील चालक असल्याचे निदर्शनास आले. त्याच्यासोबत असलेला दुसरा चालक व्हीआयपी पार्किंग परिसरात उपस्थित होता. त्यांना पुढील उपचारांसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले.दरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले.
