रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य असतानाच मुंबईतील प्रकार संताप आणणारा, परप्रांतिय कॅब चालकाने मराठी प्रवाशासोबत काय केलं पाहा?

मुंबईतल्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी. प्रवाशांशी मराठीत बोलणं अनिवार्य आहे अन्यथ आजपासून रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. आज मराठी सक्तीचा पहिलाच दिवस असताना एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे.  मुंबईत एका कॅब चालकाची मुजोरी दिसून आली आहे. मराठीतून OTP सांगण्यावरुन प्रवाशासोबत वाद घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओवरुन अनेक संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.

महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाची आजपासून राज्यभरात अत्यंत कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. असं असतानाच मुंबईत मराठीवरुन कॅब चालकाने प्रवाशांसोबत वाद घातल्याचे समोर आले आहे. मराठीतून ओटीपी सांगण्यावरून हा वाद उफाळून आला आहे. आकेड मराठी सांगितल्यामुळे परप्रांतीय टॅक्सीचालकाने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप केला जात आहे.

प्रवाशाने ओटीपी मराठीत सांगितल्यावर कॅबचालकानं प्रवाशासोबत वाद घातला.ओटीपी इंग्रजीतूनच सांगावा असा आग्रह या टॅक्सीचालकानं केला. इतकंच नाही तर टॅक्सीचालकानं प्रवाशावर आरेरावीही केल्याचंही या व्हिडिओतून दिसून येतंय.आता या मुजोर टॅक्सी चालकावर काय कारवाई होते याकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे. राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी मराठीत संवाद साधणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, काही चालकांकडून या नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे.

प्रवाशी टॅक्सी चालकाना मराठीत ओटीपी सांगतो. तेव्हा टॅक्सी चालक त्याला इंग्रजीत बोल असं सांगतो. मात्र हे सांगताना त्याची भाषा अत्यंत अरेरावीची होती. अॅप इंग्रजीत आहे तर ओटीपी पण इंग्रजीतच सांग, असा आग्रह केला. त्यावर प्रवाशांनी अॅप इंग्रजीत आहे तर मी इंग्रजीत बोलायचे का? असा सवाल त्याला केला. त्यावर कॅब चालकाने अॅप इंग्रजीत आहे की मराठीत? इंग्रजीत आहे ना? असा उलटा सवाल केला. त्यांच्या या मुजोरीला उत्तर देताना प्रवाशाने तुम्ही गाडी महाराष्ट्रात चालवताय. तुला लायसन्स महाराष्ट्राने दिलं ना? आत्तापर्यंत मराठीत घेत होता ना ओटीपी? असा सवाल प्रवाशांने केला होता. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *