सिंहगडावर पर्यटकासाठी जाताना आता पाळावे लागणार नियम, अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पावसाळी सहल, शनिवार रविवारचा विकेंड आणि सणासुदीला येणाऱ्या सुट्ट्या इत्यादी कारणांमुळे पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर होणारी पर्यटकांची गर्दी आणि त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वन विभागाने सिंहगड किल्ल्यावर प्रवेशाचे नियम घातले आहेत. किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितपणे सामावून घेण्यासाठी एक विशिष्ट क्षमता पूर्ण झाल्यावर त्यानंतर येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार नाही. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी सिंहगडावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात काही तरुणी आक्षेपार्य कपडे घालून गडावर आल्या होत्या, ज्यावरून काही स्थानिक लोकांनी त्यांना हटकले आणि ज्यावरून खूप वाद झाला होता. अशाच काही अनुचित घटना मागील काही काळात सिंहगडावर घडल्या ज्यासंबंधित कायद्यानुसार गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. तेव्हा अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी गर्दीच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. प्रवेश नियंत्रणाच्या वेळी वन विभाग आणि पोलिसांच्या कर्मचाऱ्यांशी पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच असहकार्य करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. सध्या सिंहगडाची ‘कॅरिंग कॅपॅसिटी’ वैज्ञानिक पद्धतीने निश्चित करण्याचे काम प्रस्तावित आहे.

नोंदणी करूनच पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश देणार : 

एकदा सिंहगडात एकावेळी किती पर्यटक असतील याची क्षमता निश्चित झाल्यावर त्यानंतर नोंदणी करूनच पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश देण्याची व्यवस्था केली जाईल. याकरता पर्यटकांची संख्या, वाहनांची संख्या आणि गर्दीचे नियमन करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ‘एआय’ आधारित डिजिटल मॉनिटरिंग यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरू काम सुरू आहे. ‘या बरोबरच पार्किंग किंग व्यवस्था, गर्दीची स्थिती आणि किल्ल्यावरील महत्त्वाची स्थळे यांची माहिती देणारे मोबाइल अॅप विकसित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे,’ अशी गर्दी वाढल्यास तात्पुरता प्रवेश बंद करण्यात येईल. ‘एआय’ मॉनिटरिंगची मदत माहिती पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांनी दिली.

पावसाळ्याच्या दिवसात घसरण, दरडी कोसळणे तसेच चिखल आणि निसरडे रस्ते यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. किल्ल्यावर किंवा परिसरात कचरा टाकणे, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणे, धोकादायक ठिकाणी जाणे, मद्यपान करून प्रवेश करणे किंवा मोठ्या आवाजात संगीत वाजविणे टाळावे अशा सूचना आणि आवाहन वन विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *