आज घरगुती गॅस सिलेंडर कोणत्या दराने बुक करता येणार? तपासा आजचे महाराष्ट्रातील आजचे दर

घरगुती LPG ग्राहकांसाठी आजचा दिवस दिलासादायक आहे. १३ ऑगस्ट २०२६ रोजी १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील शहरांमध्येही घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत. मुंबई आणि ठाण्यात १४.२ किलोचा घरगुती LPG सिलेंडर ₹941.50 ला मिळत आहे. पुण्यात हा दर ₹945, तर नाशिकमध्ये ₹945.50 आहे. दुसरीकडे, गडचिरोलीमध्ये घरगुती सिलेंडरचा दर ₹1,011.50 इतका आहे. दरम्यान, व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या सिलेंडरच्या किमतीत ऑगस्टच्या सुरुवातीला मोठी कपात करण्यात आली होती. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील घरगुती LPG (१४.२ किलो) | कमर्शियल LPG (१९ किलो)

  • अहमदनगर — ₹955.50 | ₹2,780.50
  • अकोला — ₹962.00 | ₹2,820.00
  • अमरावती — ₹975.50 | ₹2,850.50
  • छत्रपती संभाजीनगर — ₹950.50 | ₹2,796.50
  • भंडारा — ₹1,002.00 | ₹2,927.00
  • बीड — ₹967.50 | ₹2,826.50
  • बुलढाणा — ₹956.50 | ₹2,799.50
  • चंद्रपूर — ₹990.50 | ₹2,902.50
  • धुळे — ₹962.00 | ₹2,807.00
  • गडचिरोली — ₹1,011.50 | ₹2,941.50
  • गोंदिया — ₹1,010.50 | ₹2,941.50
  • मुंबई — ₹941.50 | ₹2,691.50
  • हिंगोली — ₹967.50 | ₹2,822.50
  • जळगाव — ₹947.50 | ₹2,780.50
  • जालना — ₹950.50 | ₹2,803.00
  • कोल्हापूर — ₹944.50 | ₹2,715.00
  • लातूर — ₹966.50 | ₹2,817.50
  • नागपूर — ₹993.50 | ₹2,915.50
  • नांदेड — ₹967.50 | ₹2,822.50
  • नंदुरबार — ₹954.50 | ₹2,718.50
  • नाशिक — ₹945.50 | ₹2,767.00
  • धाराशिव — ₹966.50 | ₹2,823.50
  • पालघर — ₹953.50 | ₹2,720.50
  • परभणी — ₹968.00 | ₹2,828.00
  • पुणे — ₹945.00 | ₹2,752.00
  • रायगड — ₹952.50 | ₹2,717.50
  • रत्नागिरी — ₹956.50 | ₹2,783.50
  • सांगली — ₹944.50 | ₹2,715.00
  • सातारा — ₹946.50 | ₹2,758.50
  • सिंधुदुर्ग — ₹956.00 | ₹2,742.00
  • सोलापूर — ₹949.50 | ₹2,791.50
  • ठाणे — ₹941.50 | ₹2,693.00
  • वर्धा — ₹1,002.00 | ₹2,931.50
  • वाशिम — ₹962.00 | ₹2,813.00
  • यवतमाळ — ₹983.50 | ₹2,865.00

टीप: घरगुती आणि कमर्शियल LPGचे दर शहरानुसार वेगवेगळे आहेत. दिलेले दर १३ ऑगस्ट २०२६ रोजी उपलब्ध माहितीनुसार आहेत.

महाराष्ट्रातील PNG दर 

  • अहमदनगर — ₹48.50
  • अकोला — ₹51.40
  • अमरावती — ₹51.40
  • छत्रपती संभाजीनगर — ₹48.50
  • भंडारा — ₹51.40
  • गोंदिया — ₹51.40
  • हिंगोली — ₹51.40
  • कोल्हापूर — ₹49.82
  • लातूर — ₹45.50
  • मुंबई — ₹51.50
  • नागपूर — ₹48.30
  • नंदुरबार — ₹48.31
  • नाशिक — ₹50.25
  • धाराशिव — ₹45.50
  • पालघर — ₹50.87
  • पुणे — ₹51.00
  • रायगड — ₹51.50
  • रत्नागिरी — ₹45.50
  • सांगली — ₹48.50
  • सातारा — ₹48.50
  • सिंधुदुर्ग — ₹49.25
  • सोलापूर — ₹48.50
  • ठाणे — ₹51.50
  • वाशिम — ₹51.40
  • यवतमाळ — ₹51.40

LPGच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होणार?

अमेरिका आणि इराणमधील तणाव तसेच पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीमुळे ऊर्जा बाजारावर दबाव कायम आहे. लाल समुद्रातील वाहतूक मार्गांबाबत निर्माण झालेली चिंता देखील LPGच्या पुरवठ्यावर परिणाम करू शकते. सध्या मात्र देशांतर्गत ग्राहकांना मोठा दरवाढीचा फटका बसलेला नाही. घरगुती LPGच्या किमती स्थिर असून कमर्शियल सिलेंडरच्या दरात झालेल्या कपातीमुळे व्यावसायिक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांना घरगुती LPG विक्रीत होणारा महसुली तोटा जुलै महिन्यात प्रति १४.२ किलो सिलेंडर सुमारे ₹500 होता. ऑगस्टमध्ये हा तोटा कमी होऊन सुमारे ₹188 प्रति सिलेंडर राहिल्याची माहिती देण्यात आली आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती, आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि PNGकडे वाढणारा कल यामुळे आगामी काळात LPGच्या मागणीवर आणि किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात: १३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात घरगुती १४.२ किलो LPG सिलेंडरचे दर स्थिर आहेत, तर कमर्शियल १९ किलो सिलेंडरच्या किमतीत ऑगस्टच्या सुरुवातीला झालेली मोठी कपात कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *