मुंबईकरांचा प्रवास आरामदायी व सूकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाय राबवण्यात येत आहेत. लोकलमधून ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच विद्यार्थीही दररोज प्रवास करतात. विद्यार्थ्यांना रोजच्या गर्दीतून लोकल प्रवास करताना अडचण येतात. त्यामुळंच भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे.
भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य डब्यांच्या आरक्षणाची मागणी केली आहे. घोसाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव यांना पत्र लिहले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता जेन झी आणि जेन अल्फांचा मुंबई लोकल प्रवास सुरक्षित होणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
