छोटा राजनला आणायला विशेष पथक इंडोनेशियात

अंडरवल्र्ड डॉन छोटा राजनला भारतात आणण्यासाठी सीबीआय व पोलीस अधिका-यांचे पथक इंडोनेशियाला रवाना झाले आहे.

विविध गुन्ह्यांसाठी राजन पोलिसांना हवा असून त्याच्यावर खटला चालवण्यासाठी त्याला आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी भारताने केली आहे.

जाकार्ता येथील भारतीय दूतावासातील प्रथम सचिव संजीव कुमार अग्रवाल यांनी राजन याची भेट घेतली. राजनला भारतात आणायला सीबीआय, मुंबई पोलीस, दिल्ली पोलीस यांचे संयुक्त पथक इंडोनेशियात गेले. मुंबई पोलिसांनी राजनच्या विरोधात ७५ तर दिल्ली पोलिसांनी सहा गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, भारत आणि इंडोनेशियात गुन्हेगार प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे भारताने इंडोनेशियन अधिका-यांकडे आवश्यक ती कागदपत्रे सोपवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *