गडचिरोलीतील आश्रमशाळेतील धक्कादायक घटना! मुली झोपेत असतानाच…; तिघींचा मृत्यू तर तीन मुली रुग्णालयात दाखल, एकच खळबळ

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातल्या जपतलाई आश्रमशाळेतील धक्कादायक घटना घडली आहे. सर्पदंशामुळे तीन मुलींना आपला जीव गमवावा लागला आहे. तसंच तीन मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जपतालाई येथील खाजगी अनुदानित निवासी आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे. यासंदर्भात तपास सुरु करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली असून, आपण यासंदर्भात अधिक माहिती मागवली असल्याचं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे.

रविवारी संध्याकाळी झालेल्या या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून तीन विद्यार्थिनी जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. जपतालाई येथील खाजगी अनुदानित निवासी आश्रम शाळेत हा प्रकार घडला असून सर्पदंशाची घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने या विद्यार्थिनींना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संदर्भात आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी व पोलीस आश्रम शाळेत दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट विश्वजीत कोवासे यांच्या परिवाराशी संबंधित ही आश्रम शाळा असल्याची माहिती पुढे आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *