प्रबळगडावर 17 वर्षीय तरुण-तरुणी वाट चुकले, पावसाळ्यात नवख्या पर्यटकांची तारांबळ, पोलीस-स्थानिकांमुळे डोंगरावरुन सुरक्षित खाली

सह्याद्रीच्या डोंगसह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंतीसाठी गेलेले १७ वर्षीय दोन पर्यटक प्रबळगड परिसरात वाट चुकल्याने डोंगरात भरकटले. त्यांनी वेळीच ११२ क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर पनवेल तालुका पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, निसर्गमित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त शोध मोहीम राबवून दोघांचीही सुखरूप सुटका केली. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे पावसाळ्यात अनोळखी डोंगररांगांमध्ये पूर्वतयारीशिवाय भटकंती करणाऱ्या नवख्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रबळगडावर जाताना वाट चुकले

माची प्रबळगडावर जाण्यासाठी निघालेले गौरी (१७) आणि उत्कर्ष (१७) डोंगरातील वाट चुकल्याने अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी संपर्क साधला. माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलिस हवालदार अमर भालसिंग आणि प्रदीप पोपटे यांनी घटनास्थळी हालचाली सुरू केल्या.ररांगांमध्ये भटकंतीसाठी गेलेले १७ वर्षीय दोन पर्यटक प्रबळगड परिसरात वाट चुकल्याने डोंगरात भरकटले. त्यांनी वेळीच ११२ क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर पनवेल तालुका पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, निसर्गमित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त शोध मोहीम राबवून दोघांचीही सुखरूप सुटका केली. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे पावसाळ्यात अनोळखी डोंगररांगांमध्ये पूर्वतयारीशिवाय भटकंती करणाऱ्या नवख्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रबळगडावर जाताना वाट चुकले

माची प्रबळगडावर जाण्यासाठी निघालेले गौरी (१७) आणि उत्कर्ष (१७) डोंगरातील वाट चुकल्याने अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी संपर्क साधला. माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलिस हवालदार अमर भालसिंग आणि प्रदीप पोपटे यांनी घटनास्थळी हालचाली सुरू केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *