केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडत सरकारला नमवल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आता आपल्या आगामी देशव्यापी रणनीतीची घोषणा केली आहे. “आमचा लढा केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. येत्या सप्टेंबर महिन्यापासून CJP देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही विशेष मोहीम राबवून देशातील ६० टक्के तरुणांचे प्रश्न थेट केंद्रस्थानी आणणार आहे,” अशी माहिती CJP चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी दिली आहे.
पुढील आंदोलनाची आणि संघटनात्मक बांधणीची आखणी करताना CJP ने ‘जॉईन द मुव्हमेंट, जॉईन CJP’ हे नवे अभियान लॉन्च केले आहे. CJP चे नेते सौरभ दास यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत ‘क्यूआर कोड’ जारी करत, देशातील जास्तीत जास्त तरुणांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. “आम्ही राजकीय पक्ष काढणार नसून, सरकारवर व राजकीय पक्षांवर सतत दबाव आणणारा ‘पब्लिक प्रेशर ग्रुप’ म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करणार आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केले.
५ झोनमध्ये देशव्यापी संघटन; क्राउड फंडिंगचा निर्णय
CJP च्या नव्या रणनीतीनुसार संपूर्ण देशाची ५ मुख्य भागांत विभागणी करून संघटन बांधणी केली जाणार आहे.
– आशुतोष रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्ना सिंग यांच्याकडे कायदेशीर बाबींची जबाबदारी असेल, तर वैष्णवी गौर या धोरणात्मक निर्णय निश्चित करतील.
– आंदोलनासाठी लागणारा निधी हा कुठल्या बड्या राजकीय पक्षाकडून किंवा उद्योजकाकडून न घेता जनतेच्या सहभागातून गोळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय CJP ने घेतला आहे.शिक्षणधंदा अन् बेरोजगारीविरुद्ध गावागावात लढासप्टेंबर महिन्यात ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेत CJP ची टीम देशातील विविध राज्यांत आणि गावांत फिरून तरुणांशी संवाद साधणार आहे. “पहिली-दुसरीच्या मुलांची १-१ लाख रुपये फी, कॉलेजेसमध्ये २५ लाख रुपयांचा मॅनेजमेंट कोटा आणि पदव्या हातात असूनही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याची तरुणांची मजबुरी… या शिक्षणधंद्याविरोधात अन् बेरोजगारीविरोधात CJP आता थेट रस्त्यावर उतरून मोठा दबाव निर्माण करेल,” असा थेट इशारा अभिजीत दीपके यांनी दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेत CJP ची टीम देशातील विविध राज्यांत आणि गावांत फिरून तरुणांशी संवाद साधणार आहे. “पहिली-दुसरीच्या मुलांची १-१ लाख रुपये फी, कॉलेजेसमध्ये २५ लाख रुपयांचा मॅनेजमेंट कोटा आणि पदव्या हातात असूनही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याची तरुणांची मजबुरी… या शिक्षणधंद्याविरोधात अन् बेरोजगारीविरोधात CJP आता थेट रस्त्यावर उतरून मोठा दबाव निर्माण करेल,” असा थेट इशारा अभिजीत दीपके यांनी दिला आहे.
