उद्या, परवा नाही तर… शिवसेनेसंदर्भातील अंतिम निकाल कधी? असिम सरोदेंनी थेट टाइमलाइनच सांगितली, ‘सर्वोच्च न्यायालयाने…’

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. 2023 पासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह त्याचबरोबर आमदारांच्या अपात्रतेबाबत सनावणी सुरू आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या निरीक्षणांवरुन आता ही सुनावणी निर्णायक टप्प्यांवर पोहोचली आहे. त्यामुळं लवकरच निकाल लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असं असतानाच  वकील असीम सरोदे यांनी निकाल कधी लागू शकतो याबाबत माहिती दिली आहे.

बुधवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पाडणार आहे. शिवसेना यूबीटीच्या वतीने ज्येष्ठ वकील कपील सिब्बल हे लढत आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाचा निकाल कधी लागेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असिम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीपर्यंत निकाल लागू शकतो.

दिवाळीपर्यंत लागू शकतो निकाल?

‘दिवाळीच्या आधी निकाल नक्की लागेल हे सांगू शकतो. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या पद्धतीवर अवलंबून आहे. पण जास्त विलंब लागणार नाही,’ असंही सरोदे यांनी म्हटलं आहे. शक्य झाल्यास पुढील 1 ते 1.5 महिन्यात पूर्ण निकाल समोर येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने त्यांची प्रतिमा जपली पाहिजे. इतके महिने जो विलंब लागवला तो चुकीचा आहे. सर्वोच्च न्यायालय ही महत्त्वाची यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये काही उणीवा असतील त्रुटी असतील. अप्रमाणिक लोक असतील. आम्ही अनेकदा या लोकांचा उल्लेख केला. पण काही गोष्टी बाजूला केल्या तर ही व्यवस्था मजबूत होऊ शकते. लोकशाहीवर प्रेम वाढू शकते. असं आपण सांगतो त्यामुळं लोकशाही आणि संविधान यावर काम करणारं सर्वोच्च न्यायालयत यांना स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी लवकरच निर्णय दिला पाहिजे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *