निष्ठावंत शिवसैनिक, गावात सर्वांशी नाळ जुळलेली, भीषण अपघातात भदाणे दाम्पत्याचा करुण अंत; अख्खं गाव धाय मोकलून रडलं

धुळ्यातील बोरकुंड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील प्रगतीशील शेतकरी आणि निष्ठावंत शिवसैनिक अशोक भदाणे व त्यांच्या पत्नीचा एका भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली आहे.

नेमकी घटना काय?

धुळे तालुक्यातील बोरकुंड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत पदाधिकारी आणि प्रगतिशील शेतकरी अशोक भदाणे व त्यांच्या पत्नी लता भदाणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळ्याहून बोरकुंडकडे दुचाकीवरून परतत असताना गरताड गावाजवळील रेल्वे पुलावर एका भरधाव ब्रेझा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या भदाणे दाम्पत्याची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *