अपघातग्रस्तांना मदत महापौर सहाय्यता निधीची घोषणा ; नियोजनाची कमी पडल्याची कबुली

नाशिकमध्ये सन २०२७मध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असून, त्याच्या योग्य नियोजनात प्रशासन कमी पडल्याची कबुली महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली. सिंहस्थाच्या कामांसह खड्ड्यांमुळे आगामी तीन महिने जखमी होणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी महापौर सहाय्यता निधीची घोषणा महापौर आहेर यांनी ‘ आम्ही नाशिककर ’ च्या सदस्यांसमोर केली. महापौर, उपमहापौरांनी नाशिककरांसोबत असल्याचे आश् वासन दिल्यानंतरही ‘आम्ही नाशिककर’ आंदोलनावर ठाम राहिले.

आंदोलनाला अराजकीय स्वरूप

शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे शहरात दररोज अपघात होत असल्याने नागरिक संतप्त आहेत. खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेबाहेर आंदोलनाचा ओघ थांबत नसल्याचे चित्र आहे. या आंदोलनाला अराजकीय स्वरूप मिळाले आहे.

आम्ही नाशिककर’

राजकारण विरहित नाशिककरांच्या संतापाला वाचा फोडण्यासाठी व प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ‘आम्ही नाशिककर’ या संकल्पनेखाली आंदोलनाची दिशा ठरविली जात असून, महासभेच्या दिवशी आंदोलन उभारले जाणार आहे. त्या पार्श् वभूमीवर ॲड. अजिंक्य गिते, देवेंद्र पाटील, प्रवीण जाधव, विनोद थोरात, सागर देशमुख यांनी बुधवारी (दि.५) महापौर, उपमहापौरांसोबत चर्चा केली. महापौरांच्या रामायण बंगल्यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मछिंद्र सानप, चंद्रकांत खोडे उपस्थित होते.

कोतकर कुटुंबीयांच्या शिक्षणाची जबाबदारी महापौर घेणार

प्रशासन कामांच्या नियोजनात कमी पडले हे मान्य त्यांना जाब विचारण्यासाठीच महासभा बोलाविण्यात आली. नागरिकांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उपमहापौर शिंदे यांनी सांगितले. अपघातात जखमी कुटुंबाना पाच लाखांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. कोतकर कुटुंबीयांच्या शिक्षणाची जबाबदारी महापौर स्वत: घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

. शहरातील समस्यांवर एकत्रित तोडगा काढण्याची
तसेच नागरिकांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची महापौर , उपमहापौरांची ग्वाही

. आयुक्तांची बदली करा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा व तातडीने रस्ते दुरूस्त करा या मागणीवर आंदोलक ठाम

. नाशिककरांच्या व्यथा मांडण्यासाठी आंदोलन सरू ठेवणार

. आंदोलनाचे स्वरुप बैठकीनंतर निश्चित केले जाणार ,मानवी साखळी पध्दतीने आंदोलनाला प्राधान्य दिले जाणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *