पार्सलमधून चोरले महागडे मोबाइल; नाशकात संशयित अटकेत, साडेअठरा लाखांचे 13 मोबाइल जप्त

एका ऑनलाइन कंपनीच्या पार्सलमधून मोबाइल चोरी करणाऱ्या संशयिताला ओझर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल १८ लाख ५० हजार रुपये किमतीचे १३ महागडे मोबाइल फोन जप्त केले.

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला संशयित अभिषेक लोकेश सिन्हा (रा. ओझर, ता. निफाड) हा एका ब्रँडेड वस्तू ऑनलाइन विकणाऱ्या कंपनीमध्ये काम करीत होता. संशयिताचे इतर साथीदार आहेत का, तसेच आणखी मोबाइल चोरीचे प्रकार त्याने केले आहेत का, याचा सध्या पोलिस सखोल तपास करीत आहेत.

संशयित बनावट पत्त्यांवर महागडे मोबाइल ऑर्डर करायचा. यानंतर ते पार्सल आल्यानंतर त्यातील मोबाइल काढून संबंधित ऑर्डर रद्द करायचा. त्याने सफाईदारपणे ही पद्धत अवलंबल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी ओझर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान संशयिताने चोरी करून विक्री केलेले विविध कंपन्यांचे एकूण १३ मोबाइल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागपूर, नाशिक, पुणे आणि ओझर येथून जप्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *