आई-बापाच्या डोळ्यांतील स्वप्न, अंगावर खाकीची इच्छा, अचानक सर्व संपलं, धावताना हृदयविकाराचा झटका; सुहासने जागीच प्राण सोडले

धुळे तालुक्यातील नगाव येथे पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असताना एका 28 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सुहास संभाजी पाटील (वय 28) हा महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत होता. सध्या तो सुट्टीवर गावी आला होता. 3 ऑगस्ट सोमवारी रोजी सायंकाळी नगाव परिसरात पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावण्याचा सराव करत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि काही क्षणांतच तो खाली कोसळला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार, त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *