बनावट दागिने शुद्ध सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र मिळवून बँकेला दहा लाख रुपयांचा चुना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना २१ ऑगस्ट २०२५ रोजी बँकेच्या एन-५ येथील बजरंग चौकातील शाखेत घडली. या प्रकरणात दागिने तारण ठेवून कर्ज उचलणारी महिला ग्राहक फरिन तबस्सुम नौशीन मलिक (रा. जहाँगिर कॉलनी, हर्सुल) आणि बँकेचा मूल्यांकनकार पवन सुरेश वर्मा (रा. नवजीवन कॉलनी, हडको) या दोघांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९० टक्के शुद्ध सोन्याचे असल्याचे प्रमाणित केले.
या प्रकरणात बजरंग चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक अनिता विनोद गाडेकर (वय ४१, रा. चिकलठाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फरिन तबस्सुम हिने २१ ऑगस्ट २०२५ रोजी सोनेतारण कर्जासाठी अर्ज केला. बँकेच्या नियमानुसार पॅनलवरील मूल्यांकनकार पवन वर्मा याने दागिन्यांची तपासणी करून ते ९० टक्के शुद्ध सोन्याचे असल्याचे प्रमाणित केले. त्यानुसार बांगड्या व ब्रेसलेटच्या तारणावर तीन लाख ४१ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.
