बस उलटून २६ प्रवासी जखमी ; बसचे ब्रेक फेल , टायर स्लिप झाले आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले

जिंतूरहून परभणीकडे जाणारी एसटी महामंडळाची बस चांदज गावाजवळ पलटल्याने २६ प्रवासी जखमी झाले. यातील तीन-चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असून, त्यांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित प्रवाशांवर जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

काय घडले

छत्रपती संभाजीनगरहून जिंतूर येथे आलेली ही एसटी बस गुरुवारी (३० जुलै) सकाळी नऊ वाजता जिंतूरहून परभणीकडे ४१ प्रवाशांना घेऊन निघाली होती. चांदज गावाजवळ अचानक वाहन समोर आल्याने बसचालकाने जोरात ब्रेक लावला. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात २६ प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तीन ते चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले

घटनेचा अधिक तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच जिंतूर आणि बोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य केले. सर्व जखमींना जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

चांदर गावाजळ झालेल्या या अपघातात.जखमींना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील काही जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जे गंभीर जखमी होते त्यांना परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखलं केले. एसटी महामंडळाच्या विभागाला अपघाताची माहिती मिळताच कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

अपघातात २६ प्रवाशी जखमी झाले.

एसटी क्रमांकMH 20 BL2240ही प्रवाशांना घेऊन छत्रपती संभाजीनगर वरून परभणी – जिंतूर मार्गाने जात होती. ही बस बोरी पोलीस ठाण्याचा हद्दीत आली असता अचानक बसचे ब्रेक फेल झाले पावसाची परिस्थिती असल्याने टायर स्लिप झाले आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली .या प्रसंगामुळे प्रवाशी चांगलेच घाबरले या अपघातात २६ प्रवाशी जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *