माझं बाळ द्या… सुनेनं लेकीला खेचलं, सासऱ्यांनी जोरात ढकललं, 28 वर्षांच्या प्राचीचा हृदयद्रावक अंत

आठ महिन्यांच्या बाळाच्या ताब्यावरुन झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान एका दुर्दैवी घटनेत झाले. झटापटीत सासऱ्याने दिलेल्या धक्क्यामुळे खाली कोसळून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. विरारमधील नारंगी गावात गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. बोळींज पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने आठ महिन्यांच्या चिमुकलीचे मातृछत्र हरपले आहे.

सासरच्या मंडळींशी वारंवार खटके

प्राची कल्पेश पाटील असे २८ वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. ती विरारजवळील नारंगी गावातील भगत आळी येथे आपल्या पती आणि सासरच्या मंडळींसोबत राहत होती. पती आणि सासरच्या इतर सदस्यांशी तिचे वारंवार खटके उडत असत, असे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी सकाळी झालेल्या कौटुंबिक वादात प्राचीला शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे. हे समजताच प्राचीचा भाऊ विशाल पाटील (३३) गुरुवारी सकाळी तिला माहेरी नेण्यासाठी तिच्या घरी आला होता. ती निघण्याची तयारी करत असतानाच, तिचे सासरे गणपत पाटील यांनी तिच्या आठ महिन्यांच्या बाळाला आपल्या ताब्यात घेतले, त्यामुळे त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

बाळावरुन सासरे-सुनेत खेचाखेची

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादाचे रुपांतर झटापटीत झाले. बाळावरुन खेचाखेची सुरु असताना गणपत पाटील यांनी प्राचीला जोरदार धक्का दिला. यामुळे तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडली; यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी सासरे गणपत पाटील यांना अटक केली. प्राचीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता का, याचाही तपास पोलीस करत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *