पश्‍चिम बंगालमध्ये मोटार अपघातात 7 मृत्युमुखी

कांछरापारा येथील कल्याणी महामार्गावर बस व मोटारीमध्ये आज (सोमवार) सकाळी झालेल्या अपघातात 7 मृत्युमुखी तर 20 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस अधीक्षक नीरज सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांची बस व एका मोटारीमध्ये आज पहाटे अपघात झाला. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. कल्याणी येथील जवाहरलाल नेहरू रुग्णालयात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *