गुरुपोर्णिमेच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हीदेखील सोनं खरेदीला जात असाल तर आत्ताच सोन्याचे दर पाहून घ्या. आज सोनं व चांदीचे दर कितीने कमी झालेत, हे पाहुयात.

मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठे बदल होत होते. यामागे अनेक कारणे होती. जागतिक राजकीय प्रभाव तसंच, युद्धाचा परिणाम यामुळं सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत होते. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. आज 29 जुलै 2026 रोजी सोन्ं 660 रुपयांनी घसरलं आहे तर चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घट झाली आहे. तर, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा दर 0.28 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 4027.50 डॉलरवर पोहोचला आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाली असून 0.36 टक्क्याने वाढून प्रति औंस 57.735 डॉलर वर व्यवहार करत आहे.

देशांतर्गंत बाजारातही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे. एमसीएक्सवर 0.21 टक्क्याने घसरून प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.41 लाख रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर, चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर प्रतिकिलो चांदी 2.16 लाख रुपयांवर व्यवहार होताना दिसत आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

24 कॅरेट प्रति ग्रॅम- 14,351
24 कॅरेट 1 तोळा (10 ग्रॅम)- 1,43,510
22 कॅरेट प्रति ग्रॅम- 13,155
22 कॅरेट 1 तोळा (10 ग्रॅम)- 1,31,550
18 कॅरेट प्रति ग्रॅम- 10,763
18 कॅरेट 1 तोळा (10 ग्रॅम)- 1,07,630

चांदीचा दर

चांदीचा दर प्रति किलो 2,35,00 इतका असून एका ग्रॅमसाठी 235 इतका आहे. तर 10 ग्रॅमसाठी 2,711 इतका भाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *